सीएमपी प्रणाली लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:25+5:302021-01-13T04:52:25+5:30
राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ व पदवीधर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने याबाबत नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर व प्राथमिक ...
राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ व पदवीधर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने याबाबत नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष माधव हासे यांनी दिली.
वेतनासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी सीएमपी प्रणालीचा उपयोग केल्यास हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. तसेच २४ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रस्ताव मागवणे, प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्या व डीसीपीएसचे हिशेब आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. तालुक्यातून निवडश्रेणीचे प्रस्ताव मागवले जाणार असून, जिल्ह्यात कोरोनाच्या काळात शाळेची वेळ एकच ठेवण्यात येणार आहे. विज्ञान पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत विचार सुरू आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष हासे, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रहिमान शेख, राजेंद्र शिंदे, नारायण राऊत, रवींद्र पिंपळे, राजेंद्र कुदनर, कैलास वर्पे, दादा वाघ, बाबा आव्हाड, सतीश चाबूकस्वार, चंद्रकांत मोरे, राजाभाऊ बेहळे, पोपट काळे, भाऊसाहेब तोरमल, चंद्रकांत वर्पे, संतोष दळे, संतोष खामकर, विनोद फलके, बाळकृष्ण कंठाळी, दिनकर दातीर, बबन गाडेकर आदींच्या सह्या आहेत.