आगामी राजकीय क्रांतीमध्ये धनगर समाजाचा महत्वाचा सहभाग : डॉ. इंद्रकुमार भिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:06 PM2018-09-15T16:06:50+5:302018-09-15T16:06:54+5:30
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणा-या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केले
अहमदनगर : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणा-या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, अॅड. अरुण जाधव, अॅड.रावसाहेब मोहन, डॉ. सुधीर क्षीरसागर, प्रकाश भोसले, दादासाहेब साठे, सुधीर वैरागर, डॉ. जालिंदर घिगे विचारपीठावर उपस्थित होते.
डॉ. भिसे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धनगर समाजाचे अतूट नाते आहे. राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षणाचा विचार केलेला आहे. समाजातील वंचित घटकांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला सत्तेचे शिखर गाठता येणार नाही. या विचारातून स्थापना झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय लढाईमध्ये धनगर समाज उत्फुर्तपणे सहभागी होईल असे ते म्हणाले. प्रा. किसन चव्हाण म्हणाले, वंचित बहुजन आघाडी नगर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिणेतील सर्व गावापर्यंत पोहचणार आहे. वातावरण निर्मितीसाठी दक्षिण व उत्तर लोकसभा मतदार संघात १ हजार कार्यकर्त्यांची मोटर सायकल रॅली काढून मतदार संघ ढवळुन काढण्यात येईल. आघाडीच्या झंझावाती वाटचालीत खोडा घालणा?्या सूयार्जी पिसाळांना आम्ही आडवे करून अडथळ्यांची शर्यत पार करू असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
डॉ. सुधीर क्षिरसागर, अॅड. रावसाहेब मोहन, दादासाहेब साठे (श्रीरामपूर), प्रकाश भोसले (शेवगाव), संजय भालेराव, बापूराव ताजने (संगमनेर), बापूसाहेब गायकवाड (जामखेड), प्रमोद काळे (श्रीगोंदा), सुधीर वैरागर (नेवासा), वसंत बोर्डे, हुमायून आतार, रामराव चव्हाण (पाथर्डी), संदीप मोकळ, विश्वास वैरागर, चंद्रकांत जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.