कोपरगावात शेताच्या बांधावरील झाडे तोडली; वृद्ध महिलेची पोलिसात तक्रार
By रोहित टेके | Updated: March 4, 2023 13:34 IST2023-03-04T13:33:06+5:302023-03-04T13:34:11+5:30
घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक काळे करीत आहेत.

कोपरगावात शेताच्या बांधावरील झाडे तोडली; वृद्ध महिलेची पोलिसात तक्रार
कोपरगाव : (जि. अहमदनगर) तालुक्यातील तिळवणी शिवारातील वृद्ध शेतकरी महिला मनकर्णाबाई भागवत खिल्लारी यांच्या मालकीच्या शेतातील बांधावर असलेली लिंबाचे व बाभळीचे झाडे अज्ञातांनी तोडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खिलारी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३) रात्री उशिरा अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक काळे करीत आहेत. दरम्यान खिलारी या विधवा असून वयोवृद्ध आहेत. त्यांचा मुलगा हा पूर्णपणे अपंग आहे. त्यामुळे गेली ४ ते ५ वर्षापासून त्या या जमिनीची देखभाल करत नव्हते. तसेच उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे स्थायिक झालेले आहे. या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसम त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही खिलारी यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.