Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By अरुण वाघमोडे | Published: September 3, 2023 04:50 PM2023-09-03T16:50:59+5:302023-09-03T16:51:56+5:30

Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले.

In Tisgaon, school students were beaten up by mischievous youths; A case has been registered against six persons | Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

- अरुण वाघमोडे
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले. त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका स्वीटच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीनंतर शिरापूर त्रिभुवनवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी तिसगावमध्ये येऊन या तरुणांचा शोध घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात येऊन वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तिसगावमधील ज्या तरुणांनी दोन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर सोपान बुधवंत (रा. शिरापूर) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरमान पठाण, सोहेल लालखाँ पठाण, आतिक पठाण, मोसिन शेख, आझाद पठाण, तोहेब असीफ सय्यद (सर्व रा. तिसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

२४ तासांत या सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी दिल्यानंतर तिसगावमधील वातावरण शांत झाले. यावेळी भाऊसाहेब लवांडे पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सरपंच नितीन लोमटे, काका पाटील लवांडे, अखिल लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर आदींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: In Tisgaon, school students were beaten up by mischievous youths; A case has been registered against six persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.