समर्थ विद्या मंदिर शाळेत ऑनलाईन वर्गाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:39+5:302021-06-25T04:16:39+5:30
अहमदनगर : सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये ऑनलाईन शिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव ल. दि. सोनटक्के यांच्या हस्ते ...
अहमदनगर : सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये ऑनलाईन शिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव ल. दि. सोनटक्के यांच्या हस्ते झाले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष भा. ल. जोशी, व्हाईस चेअरमन डी. आर. कुलकर्णी, खजिनदार स. रं. कुलकर्णी, शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, संस्था कार्यकारिणी सदस्य विकास सोनटक्के, सुरेश क्षीरसागर यांच्या हस्ते निबंध व रांगोळी स्पर्धेतील यशस्वी व सहभागी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळातील कुटुंब सर्वेक्षणातील योगदानाबद्दल शाळेतील शिक्षकांचा सत्कार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एम. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योगा व आयुर्वेदाचे महत्त्व विशद करणाऱ्या डॉ. अंजली शिंदे यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. सोनटक्के यांनी संस्था स्थापनेचा इतिहास कथन केला. भा. ल. जोशी यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील यश मिळविणारे यशस्वी शिक्षक - निबंध - लीना बंगाळ (प्रथम), मेढे व गीतांजली शेरकर (द्वितीय, विभागून), सुनीता पांडव व शारदा होशिंग (तृतीय, विभागून), रांगोळी - लीना बंंगाळ (प्रथम), हेमलता शिंदे (द्वितीय), गीतांजली शेरकर व सविता येवले (तृतीय विभागून). लीना बंगाळ यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रतिनिधी मगर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर निंबाळकर, गीतांजली शेरकर, संदीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
--
फोटो- २४ समर्थ स्कूल
सांगळे गल्लीतील समर्थ शाळेत ऑनलाईन वर्गाचे ल. दि. सोनटक्के यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.