शीतपेयांमध्ये अशुद्ध बर्फाचा खडा

By Admin | Published: May 18, 2016 11:51 PM2016-05-18T23:51:21+5:302016-05-19T00:02:31+5:30

अरुण वाघमोडे, अहमदनगर ‘मे हिट’च्या वाढत्या तडाख्यात ग्राहकांकडून थंडपेयांना मोठी मागणी वाढली आहे़

Incense snowflake in the drinks | शीतपेयांमध्ये अशुद्ध बर्फाचा खडा

शीतपेयांमध्ये अशुद्ध बर्फाचा खडा

अरुण वाघमोडे, अहमदनगर
‘मे हिट’च्या वाढत्या तडाख्यात ग्राहकांकडून थंडपेयांना मोठी मागणी वाढली आहे़ नगर शहरातील रस्त्यांसह चौकाचौकात विक्रेत्यांनी आईसक्रीमसह शीतपेयांची दुकाने थाटली आहेत़ यातील बहुतांशी शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ हा अशुद्ध पाण्यापासून बनविलेला असून ही पेये आरोग्यासाठी घातक ठरत आहेत़
अन्न, औषध प्रशासनाची परवानगी असलेला एकही कारखाना सध्या नगर शहरात नाही, तरी सकाळी सात वाजता शहरातील शीतपेये विक्रेत्यांना सहज बर्फ उपलब्ध होत आहे़ स्थानिक ठिकाणी मिळेल त्या पाण्यापासून बर्फ बनविणाऱ्यांची शहरात मोठी संख्या आहे़ उन्हाळ्यामुळे बर्फाला मोठी मागणी असून, शीतपेये विक्रेत्यांना हा अशुद्ध बर्फ विकला जात आहे़
बर्फाच्या कारखान्यासाठी अन्न, औषध प्रशासनाची परवानगी लागते़ तसेच अन्नपदार्थांमध्ये वापरण्यात येणारा बर्फ बनविताना तो शुद्ध पाण्यापासून तयार करणे बंधनकारक आहे़ मात्र, हा बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवितात़ शहरात उसाचा रस, ताक, लस्सी, सोडा, ज्यूस, सरबत व आईसक्रीमच्या ठिकठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत़ या सर्वच विक्रेत्यांकडे दिवसभर ग्राहकांची मोठी वर्दळ असते़ या ठिकाणी दिले जाणारे थंड पदार्थ मात्र, आरोग्याला घातक ठरणारे आहेत़
नगर शहरात अन्न, औषध प्रशासनाची परवानगी असलेला एकही बर्फाचा कारखाना नाही़ शहरात खराब पाण्यापासून तयार केलेला बर्फ विकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे़ अशुद्ध बर्फ विक्री करताना कुणी आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येईल.
-बालू ठाकूर, सहायक आयुक्त,
अन्न,औषध प्रशासन

Web Title: Incense snowflake in the drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.