प्रोत्साहन भत्ता, वेतनवाढीसाठी परिचारिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:04+5:302021-07-07T04:26:04+5:30

प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका. या कोरोना काळाच्या महामारीत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या ...

Incentive allowance, movement of nurses for salary increase | प्रोत्साहन भत्ता, वेतनवाढीसाठी परिचारिकांचे आंदोलन

प्रोत्साहन भत्ता, वेतनवाढीसाठी परिचारिकांचे आंदोलन

प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका. या कोरोना काळाच्या महामारीत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची कर्मचारी म्हणजे अर्धवेळ परिचारिका होय. केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे ७ ते ८ तास रोज काम करते, परंतु तिचा पगार केवळ ३ हजार रूपये आहे. या महागाईच्या काळात शंभर रुपये रोजाने कुणी काम करणारे दुसरे कोणी मिळणार नाही. परंतु आज ना उद्या या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत राबत आहेत. मागील वर्षीच्या कोरोना काळात अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. किमान वेतनानुसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी व यापुढील सर्व वेतन हे त्यांना ऑनलाइन पद्धतीने देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शालिनीताई लांडे, जयश्री कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, गणेश गायकवाड, अमोल गायकवाड, गणेश निमसे, किरण गाढवे, सिद्धांत आंधळे, किरण जावळे, उमेश करपे आदींसह परिचारिका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-----------

फोटो - ०५जनाधार आंदोलन

परिचर महिलांना कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता, किमान वेतन वाढ व निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आले.

Web Title: Incentive allowance, movement of nurses for salary increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.