अहमदनगर निजामशाहीत सोन्या-चांदीच्या नाण्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:04+5:302021-05-28T04:17:04+5:30

१५ व्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्य फुटून त्याच्या ५ सलतनी तयार झाल्या. त्यातील अहमदशहा बहिरी (मलिक अहमद) याने जुन्नर ...

Inclusion of gold-silver coins in the Ahmednagar Nizamshahit | अहमदनगर निजामशाहीत सोन्या-चांदीच्या नाण्यांचा समावेश

अहमदनगर निजामशाहीत सोन्या-चांदीच्या नाण्यांचा समावेश

१५ व्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्य फुटून त्याच्या ५ सलतनी तयार झाल्या. त्यातील अहमदशहा बहिरी (मलिक अहमद) याने जुन्नर येथे स्वतःचे वेगळे राज्य घोषित केले. त्यानंतर इ.स. १४९० ला अहमदनगरजवळील भिंगार गावाजवळ स्वतंत्र राज्याची म्हणजे अहमदनगरची स्थापना केली आणि त्याने राजधानीचे शहर म्हणून अहमदनगरचीच निवड केली. त्या अहमदशहाने बरीच महत्त्वाची बांधकामे स्वतःच्या कारकिर्दीत केली. १५१० मध्ये अहमद निजामशहाचा मृत्यू झाला तेव्हा अहमदनगरच्या निजामशाहीत दौलताबाद, कोकण, ठाणे, राजापूर हा प्रदेशही होता. त्यानंतरच्या राजांच्या काळात राज्याचा व्यापार हा आखाती देशातील इराणपर्यंत चालत असे. कारण आखाती भागातील नाण्यावर प्रचलित असलेल्या तत्कालीन राजांच्या कॅलिग्राफीचा परिणाम अहमदनगरच्या निजामशाही नाण्यावरील आकर्षक व सुबक रचनेच्या नाण्यांवर दिसून येतो. अहमदनगरच्या निजामशाहीतील नाण्यांचा म्हणजे इ.स. १४९० ते १६३६ या कालखंडातील नाण्यांचा अभ्यास केला असता फक्त दोनच प्रकारची नाणी ही सोन्याची आढळतात. ज्यांचे वजन २.९० ग्रॅम ते ३.५० ग्रॅम होते. त्यात मुर्तुजा निजामशहा पहिला (१५६५ ते १५८८) व दुसरे नाणे बुऱ्हाण निजामशहा व्दितीय (१५९१ ते १५९५) या काळातील बुऱ्हाणाबाद मिंटचे आहे. तसेच त्याचे एक चांदीचे नाणेही आढळते. वरील सर्व नाणी ही खूप कमी प्रमाणात सापडतात. त्यातील नाण्यावर असलेले शेवटचे शब्द अलअली अल्लाह हे तत्कालीन दख्खन भागातील निजामशाहीचा वाढता प्रभाव दर्शवितात. बाकी सर्व नाणी ही तांब्याची मिळतात. त्यात प्रामुख्याने फालुस, पैसा किंवा तत्कालीन चलन हे नाणे १४ ते १५.६ या वजनातील आढळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहमदनगरच्या टंकसाळीबरोबरच नाण्यावर फक्त मुर्तुजा आणि बुऱ्हाण ही दोनच नावे आढळतात. त्याव्यतिरिक्त कोणत्याही राजाचे नाव दिसत नाही. म्हणजेच मुर्तुजा पहिला याच्या अगोदर (१५६५ ते १५८८) पूर्वीच्या निजामाची नावे कोणत्याही तांब्यांच्या नाण्यावर आढळत नाही.

----------

नाण्यांवर शहरांच्या नावाचा उल्लेख

नाण्यांवर दिसणाऱ्या टंकसाळीत प्रामुख्याने अहमदनगर, बुऱ्हाणाबाद, दौलताबाद, मुर्तुजाबाद, नगर, परांडा या टंकसाळीची नाणी मिळतात. ज्यामध्ये दार अल सल्तनत बुऱ्हाण दुसरा याने भिंगार जवळील भागाला दिलेले नाव होते. नंतरच्या कालखंडात मुघलांच्या अहमदनगरवरील आक्रमणानंतर तसेच प्रस्थापित झाल्यानंतर काही नाणी आहेत. त्यानंतर जहांगीरच्या काळातील चांदीचे रुपये हे दिनांक १०१३ सालातील मिळतात. नंतर शहाजहान प्रथमच्या अहमदनगरवरील ताब्यानंतरची पूर्ण नाणी ही मुघल शैलीतीलच आढळतात.

----------

फोटो - २७नाणी १,२,३

निजामकालीन सोन्या-चांदीची नाणी.

Web Title: Inclusion of gold-silver coins in the Ahmednagar Nizamshahit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.