ठेवीमध्ये १५ कोटी ७० लाख रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:08+5:302021-04-05T04:19:08+5:30
कर्ज व वसुलीला कर्जदारांचे सहकार्य चांगले मिळाल्याने थकबाकी सात टक्के राहिली. कर्जवसुली ९३ टक्के पूर्ण झाली आहे. संस्थेचे वसूल ...
कर्ज व वसुलीला कर्जदारांचे सहकार्य चांगले मिळाल्याने थकबाकी सात टक्के राहिली. कर्जवसुली ९३ टक्के पूर्ण झाली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल एक कोटी ९२ लाख रुपये इतके असून, स्वनिधी सहा कोटी २२ लाख रुपये आहे. तरलता निधी (लिक्विडीटी) ९० कोटी ७६ लाख रुपये इतका असून, ठेवींच्य तुलनेत कर्जवाटप कमी झाले आहे. तरीही नफा ४१ लाख रुपये झाला, अशी माहिती अध्यक्ष मधुकर नवले, उपाध्यक्ष रमेश जगताप, मुख्य व्यवस्थापक दादाभाऊ झोळेकर यांनी दिली.
कोट- बुवासाहेब नवले मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेची सभासदसंख्या २६५४ असून, भागभांडवल ४३,५१,१६० रुपये आहे. संस्थेचे स्वनिधी १,१५,४३,०२१ रुपये असून, ठेवी ९० कोटी रुपये आहेत. कर्जवाटप ४५ कोटी २६ लाख रुपये असून, गुंतवणूक २५ कोटी ८० लाख रुपये आहे. कायम मालमत्ता दहा कोटी ३६ लाख रुपयांची असून, कर्जवसुली ९८.१३ टक्के आहे. नफा १९ लाख ९० हजार रुपये झाला असल्याची माहिती चेअरमन विक्रम नवले, व्हाइस चेअरमन नवनाथ वाळुंज, मुख्य व्यवस्थापक विलास नवले यांनी दिली.