नगर शहरात २० लसीकरण उपकेंद्र वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:18+5:302021-05-30T04:18:18+5:30

अहमदनगर : पावसाळ्याचे दिवस आणि सध्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आरोग्य केंद्रांतर्गत आणखी २० उपकेंद्र वाढविण्यात आले ...

Increased 20 vaccination sub-centers in the city | नगर शहरात २० लसीकरण उपकेंद्र वाढवले

नगर शहरात २० लसीकरण उपकेंद्र वाढवले

अहमदनगर : पावसाळ्याचे दिवस आणि सध्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आरोग्य केंद्रांतर्गत आणखी २० उपकेंद्र वाढविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना लसीकरण सुलभ होणार आहे.

सध्या नगर शहरात लसीकरणावरून वाद होत असून नागरिकांचीही केंद्रावर गर्दी होत आहे. लस पळवापळवीचे प्रकारही शहरात घडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना उन्हात उभे राहूनही लस मिळत नसल्याची स्थिती आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी महापालिकेअंतर्गत आधीच्या आरोग्य केंद्रासह आणखी २० लसीकरण उपकेंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये काही भागात मंगल कार्यालयातही ही व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेली लसीकरण उपकेंद्रांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

--

लसीकरण केंद्र आणि कंसात उपकेंद्र

केडगाव आरोग्य केंद्र (निशा लॉन), केडगाव नागरी आरोग्य केंद्र (भाग्योदय मंगल कार्यालय), जिजामाता नागरी आरोग्य केंद्र (ओम गार्डन, अंकुर लॉन, इंद्रप्रस्थ लॉन, हमाल पंचायत भवन), माळीवाडा (शिवपावन मंगल कार्यालय, मराठा मंगल कार्यालय), तोफखाना आरोग्य केंद्र (पोलीस लॉन्स, कोंडाजी मामा मंगल कार्यालय, एस.टी. महाले मंगल कार्यालय, लोणारी मंगल कार्यालय), सावेडी उपकेंद्र (सिंधी हॉल-तारकपूर, आम्रपाली गार्डन-गुलमोहोर रोड), मुकुंदनगर आरोग्य केंद्र (गंगा लॉन्स-निर्मलनगर), सावेडी उपकेंद्र (शुभ मंगल कार्यालय-सावेडी नाका), बोल्हेगाव (संजोग लॉन्स), सावेडी उपकेंद्र (गुरुदत्त लॉन्स, बालिकाश्रम रोडचा मागचा भाग), मुकुंदनगर आरोग्य केंद्र ( एन.एम. गार्डन), बोल्हेगाव आरोग्य केंद्र (बचत भवन).

Web Title: Increased 20 vaccination sub-centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.