नगर बाजार समितीत चारा विक्रीसाठी वाढीव वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:08 PM2019-01-04T13:08:57+5:302019-01-04T13:09:45+5:30
चारा विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना दुपारी बारा वाजेपर्यंत चारा विकण्यास परवानगी दिली आहे.
केडगाव : चारा विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना दुपारी बारा वाजेपर्यंत चारा विकण्यास परवानगी दिली आहे. वेळ वाढवून मिळावी किंवा दुष्काळ संपेपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगर तालुक्यातील शेतका-यांनी बाजार समितीला दिले आहे. उस विक्रीसाठी दोन तास वेळ जास्त देण्यात येणार आहे.
नगर तालुक्यातील दूध उत्पादक व पशुधन मालक व्यापा-यांच्या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना सकाळी दहा वाजेपर्यंत चारा विकण्याचे बंधन घालून दिले होते. आता हे बंधन दूध उत्पादकांना व पशुधन मालकांना परवडणारे नाही. त्यामुळे आडतदार ऊस उत्पादकांना चारा जास्त आणून देत नव्हते. सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान संपूर्ण माल विकला पाहिजे जर विकला नाही तर तेथील स्थानिक व्यापारी व दुकानदार येणा-या वाहनांचे सर्व चाकाची हवा सोडून देतात. यावर्षी दुष्काळ असल्यामुळे सध्या भरपूर ऊस शिल्लक आहे. परंतु वेळेअभावी हा ऊस विक्रीसाठी येत नाही तरी मार्केट कमिटी ने दिवसभरासाठी चारा विक्री खुली करावी किंवा दोन तास वाढवून मिळावे जेणेकरून नगर तालुक्यातील दूध उत्पादक व पशुधन मालकांना योग्य त्या भावाने चारा विकत मिळेल. उसाचे आडतदार वाहनाचे वजन करत नाहीत. वाहन चालक जो सांगेल ते वजन धरतात. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. जर शंभर किलोच्या पुढे वाहनांचा फरक पडला तर त्या वाहन धारकांकडून एका टनाचे पैसे शेतक-यांना मिळावे असे बाजार समितीने आडातदारांना लेखी कळवावे किंवा दुसरी पयार्यी जागा तात्पुरती शहराच्या उत्तर व दक्षिण भागाला उपलब्ध करून द्यावी शोधा अशी मागणी केली शेतक-यांनी केली होती. या बाबतचे निवेदन वसंतराव आढाव, शंकर वाघ, काशिनाथ बेरड, राजीव जाधव या शेतक-यांनी बाजार समितीला दिले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले यांनी दोन तास उस विक्री साठी वाढवून दिला जाईल तसेच बारा वाजेपर्यंत ऊस विकता येईल असे शेतक-यांना सांगितले.