ॲानलाईनची कामे काढून घेत नाही, तोपर्यंत आशासेविकांचा बेमुदत संप
By चंद्रकांत शेळके | Published: October 18, 2023 04:40 PM2023-10-18T16:40:40+5:302023-10-18T16:41:48+5:30
बुधवारी (दि. १८) विविध मागण्यांसाठी आशासेविका, तसेच गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
अहमदनगर : आशासेविका कमी शिकलेल्या आहेत, तरीही त्यांना आयुष्मान कार्ड काढण्यासारखे ॲानलाईन काम देण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे जोपर्यंत हे ॲानलाईन काम काढून घेतले जात नाही, तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय आशासेविकांनी घेतला आहे.
बुधवारी (दि. १८) विविध मागण्यांसाठी आशासेविका, तसेच गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. त्यावेळी आशासेविकांना आपल्या भावना व्यक्त केल्या. आरोग्य विभागातर्फे गावोगाव पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड काढून ते आशासेविकेमार्फत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मूळात आशासेविका कमी शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना मोबाईलमध्ये या कार्डबाबत प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे हे ॲॅानलाईन काम देऊ नये, अशी मागणी आशासेविकांनी पूर्वीच केलेली आहे.
तरीही आरोग्य विभागाकडून सक्तीने हे काम दिले जात आहे. जोपर्यंत हे काम काढून घेतले जात नाही तोपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार आशासेविकांनी केल्याचे बोलून दाखवले. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुधीर टोकेकर, काॅ. सुरेश पानसरे, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, निवृत्ती दातीर आदींसह शेकडो आशासेविका उपस्थित होत्या.