पॅरामोटरमध्ये भारताला सुवर्ण; आप्पासाहेब ढुस यांची कामगिरी

By Admin | Published: May 17, 2017 03:21 PM2017-05-17T15:21:01+5:302017-05-17T18:21:52+5:30

आॅनलाईन लोकमत अहमदनगर, दि़ १७ - पॅरामोटर या साहसी क्रीडा प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देऊन राहुरीच्या आप्पासाहेब ढुस ...

India gold in paramotor; Appasaheb Dhus' performance | पॅरामोटरमध्ये भारताला सुवर्ण; आप्पासाहेब ढुस यांची कामगिरी

पॅरामोटरमध्ये भारताला सुवर्ण; आप्पासाहेब ढुस यांची कामगिरी

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १७ - पॅरामोटर या साहसी क्रीडा प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देऊन राहुरीच्या आप्पासाहेब ढुस यांनी इतिहास घडविला आहे़.  त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप स्पर्धेतील आप्पासाहेब ढुस यांचा सहभाग निश्चित झाला आहे़
एशियन-ओशियानिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप व वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पीयनशीप टेस्ट कॉम्पिटीशन (प्री वर्ल्ड कप) स्पर्धा नुकतीच थायलंड येथे १ ते ७ मे दरम्यान झाली़ या स्पर्धेत भारतातून आप्पासाहेब ढूस व इंडिगो कंपनीतील वैमानिक पी़ आ़ सिंग (हैदराबाद) यांनी तर रुस, जपान, आॅस्ट्रेलिया, कतार, थायलंड आदी देशांमधील ६७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता़ राहुरी येथील आप्पासाहेब ढुस यांनी प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात सुवर्णवेध घेतला़ या टास्कमध्ये ढुस यांनी १ तास २८ मिनिट ३९ सेकंद इतकी वेळ नोंदवून सर्वाधिक वेळ हवेत तरंगण्याचा विक्रम केला़ तसेच ३५०० फूट उंचीवर उड्डाण घेत सर्वाधिक १८ गुण ढुस यांनी मिळविले़ तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या थायलंड येथील पायलट वोरावी विथायायारनोन याने १ तास २० मिनिटे २८ सेकंद वेळ नोंदवून १३ गुणांची कमाई केली़ थायलंडच्याच समन प्रोमनारी याने १ तास १२ मिनिटे ४३ सेकंद इतकी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला़ आप्पासाहेब ढुस यांना या स्पर्धेसाठी स्पेनच्या डेव्हीड ग्राऊपॅरा यांनी मार्गदर्शन केले़ भारताचे दुसरे खेळाडू सिंग यांना रजत पदकावर समाधान मानावे लागले़

{{{{dailymotion_video_id####x844z6u}}}}

 

Web Title: India gold in paramotor; Appasaheb Dhus' performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.