इंडियन मेडिकल असोसिएशनची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:31+5:302021-05-11T04:21:31+5:30
श्रीरामपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यातील ४५ हजार डॉक्टर्स अहोरात्र रुग्णालयात काम करीत आहेत. गेल्या एक ते ...
श्रीरामपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यातील ४५ हजार डॉक्टर्स अहोरात्र रुग्णालयात काम करीत आहेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून हा मानवतेचा वसा असोसिएशनच्या डॉक्टर्सनी हाती घेतला आहे. आपले सर्वस्व पणाला लावून व कुटुंबातील सर्वांपासून वेगळे राहून हे आव्हान डॉक्टर्स पेलत आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भूषण देव यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रकाशित पत्रकात डॉ. देव यांनी कोरोना काळात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. त्यावर उपाध्यक्ष डॉ. संजय शेळके, सचिव डॉ. सुनील गोराणे, खजिनदार समीर बडाख यांच्या सह्या आहेत. डॉ. देव म्हणाले की, लोकांनी न घाबरता काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कुठलेही लक्षण दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची चाचणी वेळेवर आणि लवकर करा. आजार अंगावर काढू नका. ऐकिवात असलेल्या माहितीवर विसंबून राहून स्वतः उपचार करू नका. कुठल्याही शंका असल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना आजारामध्ये लवकरात लवकर उपचार करणे फायदेशीर आहे. मास्क वापरणे, गर्दीत न जाणे, गर्दी न करणे, स्वच्छता राखणे या साध्या-सोप्या गोष्टींचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.