नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:40 PM2018-05-02T18:40:31+5:302018-05-02T18:41:04+5:30

शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त खब-या मार्फत मिळाली.

 Indigenous pistol seized in Nevash; One arrested | नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

नेवासा : शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त खब-या मार्फत मिळाली. त्यानंतर नेवासा पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सचिन उर्फ गटण्या याच्या घरात जाऊन त्यास पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या उषा खाली देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये किमतीचे पिस्तुल सापडले. पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.सचिन पवार याने विनापरवाना बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी सचिन पवार याच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पवार याच्यावर ३९५, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो फरारी होता.
पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, हनुमंत गर्जे, संदीप दरंदले यांनी ही कारवाई केली

Web Title:  Indigenous pistol seized in Nevash; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.