अखेर इंदोरीकर महाराजांनी दिलं नोटिशीला वकिलामार्फत उत्तर, म्हणतात की...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 04:56 PM2020-02-19T16:56:48+5:302020-02-19T17:10:03+5:30
Indurikar Maharaj : गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या नोटिसीला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वकील आणि सेवकामार्फत लेखी उत्तर दिले आहे.
अहमदनगर : गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या नोटिसीला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वकील आणि सेवकामार्फत लेखी उत्तर दिले आहे. या उत्तराबाबत जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या समितीने १२ फेब्रुवारी रोजी इंदोरीकर महाराजांना त्यांच्या ओझर (ता.संगमनेर) येथील निवासस्थानी वैद्यकीय अधिकाºयांमार्फत नोटिस बजावली होती. या नोटिसीवरुन गेल्या आठ दिवसापासून वाद सुरू झाला होता. याबाबत इंदोरीकर यांनी माफनामाही प्रसिध्द केला होता.
दरम्यान, बुधवारी दुपारी इंदोरीकर यांचे वकील शिवडीकर हे सेवकांसोबत जिल्हा रुग्णालयात आले होते. नोटिसीला उत्तर देण्याचा आज (दि.१९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस होता. दरम्यान शिवजयंतीची आज शासकीय सुटी असल्याने समितीचे प्रमुख तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर हे रुग्णालयात नव्हते. त्यामुळे इंदोरीकर यांच्या वकिलांनी अपघात कक्षात असलेल्या अधिकाºयांकडे लेखी खुलासा सादर केला. खुलासा मिळाल्याच्या झेरॉक्स प्रतींवर सही, शिक्के घेऊन अॅड. शिवडीकर हे मागच्या दाराने निघून गेले. याबाबत अधिक माहिती विचारली असता शिवडीकर आणि डॉक्टरांनीही बोलण्यास नकार दिला. तसेच दोन दिवसात इंदोरीकर महाराज आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवडीकर यांनी सांगितले.