इंदोरीकर म्हणतात..मी घरीच..!; काही दिवस कीर्तन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:00 PM2020-03-22T13:00:14+5:302020-03-22T13:01:03+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास रविवारी (२२मार्च) नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मीही आज घरीच आहे. काही दिवस माझे किर्तनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. तुम्हीही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज यांनी इंदोरीकर यांनी केले.
अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास रविवारी (२२मार्च) नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मीही आज घरीच आहे. काही दिवस माझे किर्तनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. तुम्हीही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज यांनी इंदोरीकर यांनी केले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मी जनता कर्फ्यूत सहभागी झालो आहे. सकाळपासून घरातच आहे. कुणीही घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद द्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे.