इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा; खटला केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:10 PM2021-03-30T19:10:50+5:302021-03-30T19:11:58+5:30

Indorikar Maharaj got big relief from Court : याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात  सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला.

Indorikar Maharaj granted big relief by the court; The lawsuit was dismissed | इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा; खटला केला रद्द

इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा; खटला केला रद्द

ठळक मुद्देत्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात  सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

इंदोरीकर यांची सुनावणी ८ डिसेंबरला


या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के. डी. धुमाळ काम पहात आहेत. त्यानंतर इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी या खटल्यातून माघार घेतली होती.  त्यानंतर आज न्यायालयाने निकाल देत खटला रद्द केला.

Web Title: Indorikar Maharaj granted big relief by the court; The lawsuit was dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.