इंदुरीकर महाराजांचे ३० मे पर्यंतचे कार्यक्रम रद्द, प्रकृती अस्वस्थामुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:58 PM2022-05-24T19:58:57+5:302022-05-24T19:59:17+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj ) यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.
नगर-
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj ) यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थामुळे इंदुरीकर महाराजांनी २३ ते ३० मे पर्यंतचे त्यांचं सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. कार्यक्रम रद्द करावे लागल्याबाबत इंदुरीकर यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदुरीकर महाराजांना किडनी स्टोनचा त्रास आहे. याच आजारावर संगमनेर येथेल इंदुरीकर महाराजांवर हायट्रो थेरेपी केली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या अनोख्या शैलीनं भजन, किर्तनात सामाजिक विषयांवर भाष्य करणारे इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमासाठी दूरदूर हून लोक आवर्जून हजेरी लावत असतात. किर्तनातील काही वादग्रस्त विधानांनीही इंदुरीकर चर्चेत आले होते.