इंदूरीकर महाराजांचा फेटा अन् विखेची 'जय श्रीराम'ची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:03 PM2020-08-16T13:03:36+5:302020-08-16T13:04:48+5:30
संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केला. तर विखेंनी त्यांना जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घातली. त्यामुळे देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी काही राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती.
इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती. असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती.
शनिवारी संध्याकाळी खासदार डॉ. विखे यांनी अचानक इंदुरीकर महाराजांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या परिवाराशी संवाद साधत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. डॉ. विखे यांचा इंदुरीकर महाराजांनी फेटा बांधून केलेला सत्कार केला. तर विखे यांनी जय श्रीरामची शाल देवून महाराजांचा सत्कार केला. या भेटीबाबत खासदार डॉ. विखे यांच्याशी संपर्क साधला असता ही माझी फक्त सदीच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
_
फोटो-
खासदार डॉ. सुजय विखे यांनी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या घरी त्यांची भेट घेतली.