कोपरगाव तालुक्यातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:20 PM2020-06-20T19:20:55+5:302020-06-20T19:32:33+5:30
कोपरगाव : तालुक्यातील करंजी येथील ५० वर्षीय व्यक्तिला तर शहरातील संजयनगर येथील एक ५८ वर्षीय महिलेला अशा एकूण दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. यातील ५० वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ४ व्यक्तींना तर ५८ वर्षीय महिलेच्या संपर्कातील ६ व्यक्तींना क्वारनटाईन करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
कोपरगाव : तालुक्यातील करंजी येथील ५० वर्षीय व्यक्तिला तर शहरातील संजयनगर येथील एक ५८ वर्षीय महिलेला अशा एकूण दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
यातील ५० वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ४ व्यक्तींना तर ५८ वर्षीय महिलेच्या संपर्कातील ६ व्यक्तींना क्वारनटाईन करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
कोरोना बाधित अहवाल आलेली व्यक्तीचा मुलगा हा चांदवड येथे नोकरीस आहे. बाधित व्यक्ती आठ दिवसापूर्वी चांदवड येथे आपल्या मुलाकडे गेली होती. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने चांदवड येथेच त्यांची कोरोनाची तपसणी करण्यात आली. शनिवारी तपासणी अहवाल पोझीटिव्ह आला आहे. त्यामुळे करंजी येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या ४ व्यक्तींना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. दरम्यान बाधित व्यक्ती ही चांदवड येथेच उपचार घेत आहे. प्रशासनाने सर्व खबरदारीच्या उपाय योजना केल्या आहे.