को-केअर ॲपच्यामार्फत आरोग्य केंद्रांची माहिती उपयुक्त ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:50+5:302021-08-29T04:22:50+5:30
कोपरगाव तालुक्यातील मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारे को-केअर ॲप तयार केले ...
कोपरगाव तालुक्यातील मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारे को-केअर ॲप तयार केले आहे. या ॲपची सुरुवात शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली होती. को-केअर ॲपची निर्मिती मनस्वीने सुमारे तीन महिने मेहनत घेऊन पूर्ण झाल्यावर तहसीलदार योगेश चंद्रे यांना दाखविले. याप्रसंगी विशेष आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे-आव्हाड, मंदार आढाव, सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके, अमन आढाव, राजहंस आढाव उपस्थित होते.
.........
२८ मनस्वी आढाव
को-केअर ॲपची निर्मिती केल्याबदल मनस्वी आढाव हिचे कौतुक करताना तहसीलदार योगेश चंद्र, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे.
280821\img-20210827-wa0061.jpg
फोटो २८ : मनस्वी आढाव सत्कार - कोपरगाव