वणवे रोखण्यासाठी सह्याद्री देवराई परिवाराचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:29+5:302021-04-10T04:20:29+5:30

राऊत म्हणाले, वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्र लगतच्या ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. वणवे अनेक वनक्षेत्रात भडकताना दिसत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती ...

Initiative of Sahyadri Devrai family to prevent floods | वणवे रोखण्यासाठी सह्याद्री देवराई परिवाराचा पुढाकार

वणवे रोखण्यासाठी सह्याद्री देवराई परिवाराचा पुढाकार

राऊत म्हणाले, वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्र लगतच्या ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. वणवे अनेक वनक्षेत्रात भडकताना दिसत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

एकीकडे वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम धडाकेबाज होताना दिसत आहेत. विविध संस्था, संघटना, लोकसहभाग घेऊन या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. तसेच वनविभाग दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत असताना असे वणवे लागणे अत्यंत दुःखदायक व प्रचंड हानिकारक आहेत. किडा-मुंगी, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, झाडे-वेलींची सर्वांची पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाची मोठी हानी अशा वणव्यांमुळे होत आहे. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वाढणारे तापमान व प्रदूषण रोखण्यासाठी वन संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.

वन संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहेत. या कामी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. तसेच पर्यटन म्हणून डोंगर वनविभागात फिरणाऱ्या पर्यटकांनी आपल्याकडून नजरचुकीने देखील आग लागल्यास आपण कारणीभूत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. याकामी जागरूकतेने वन अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्त जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.

Web Title: Initiative of Sahyadri Devrai family to prevent floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.