चार मंत्री असूनही नगर जिल्ह्यावर अन्याय; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:17 IST2020-11-04T12:15:06+5:302020-11-04T12:17:12+5:30
पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्यासारख्या घटना घडल्या. पण तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले, पण त्यांनीही फक्त त्याच्या मतदार संघातील शिरापूर गावातच भेट दिली. तिथूनच ते निघून आले. यावरूनच जिल्ह्यामध्ये चार मंत्री असतानाही जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा सरकारकडून न्याय मिळत नसल्याचे दिसून येतेय, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.

चार मंत्री असूनही नगर जिल्ह्यावर अन्याय; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्यासारख्या घटना घडल्या. पण तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले, पण त्यांनीही फक्त त्याच्या मतदार संघातील शिरापूर गावातच भेट दिली. तिथूनच ते निघून आले. यावरूनच जिल्ह्यामध्ये चार मंत्री असतानाही जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा सरकारकडून न्याय मिळत नसल्याचे दिसून येतेय, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता शिवाजी कर्डिले यांनी टीका केली. मंगळवारी नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी कर्डिले बोलत होते.
पाथर्डी तालुक्यामध्ये बिबट्याने तीन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. मात्र या नरभक्षक बिबट्याला अद्यापपर्यंत पकडण्यात यश आले नाही. 'मढी, केळवंडी व शिरापूर या तीन गावातून लहान मुलाला बिबट्याने उचलून नेले. मढी येथील घटना घडल्यानंतर लक्ष दिले असते, तर पुढचा प्रकार हा टाळता आला असता, असेही ते म्हणाले.