खेड्यात कोविड सेंटर उभे करणे प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:57+5:302021-05-06T04:21:57+5:30

५० बेडचे हे सेंटर उभे करण्यात आले आहे. तालुक्यातील आडगाव शेजारील केलवड, खडकेवाके, पिंपरी - लोकई, पिंपरी - निर्मळ ...

Inspiring to set up a covid center in the village | खेड्यात कोविड सेंटर उभे करणे प्रेरणादायी

खेड्यात कोविड सेंटर उभे करणे प्रेरणादायी

५० बेडचे हे सेंटर उभे करण्यात आले आहे. तालुक्यातील आडगाव शेजारील केलवड, खडकेवाके, पिंपरी - लोकई, पिंपरी - निर्मळ आदी गावांना मोठा आधार मिळणार आहे. आडगाव येथील जय मल्हार मंगल कार्यालयात हे सेंटर सुरू केले आहे. डॉ महेश राऊत, डॉ. संतोष मैड, डॉ. आशुतोष मैड, डॉ. शिवांजली काळे, डॉ. अभिजित कडलक या डॉक्टर यांनी एकत्रित येत हे सेंटर उभे केले आहे.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ संजय गायकवाड, डॉ संतोष मैड, आडगावचे सरपंच प्रदीप गायकवाड, पोलीस पाटील सुरेश गमे, विठोबा राऊत, दत्तात्रय गुंजाळ, दीपक कांदळकर, दत्तात्रय सोनवणे आदी उपस्थित होते .

...........

खेडे गावात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे खेडे गावात कोविड सेंटरची खूप गरज होती. सेंटरमध्ये लवकर बरे होण्याची चिन्ह आहेत. - - डॉ. महेश राऊत, केलवड, ता - राहाता

-------------

०५ अस्तगाव

Web Title: Inspiring to set up a covid center in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.