कोरोना योद्ध्यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:24+5:302021-06-16T04:28:24+5:30
श्रीरामपूर : कोरोना महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून इतरांना केलेली मदत ...
श्रीरामपूर : कोरोना महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून इतरांना केलेली मदत हे सर्वांत मोठे कार्य आहे, असे पंडित दीनदयाल पंतसंस्थेचे अध्यक्ष व भाजप नेते वसंत लोढा यांनी सांगितले.
येथील भाजप कार्यालयात कोरोना महामारीत सेवाभावी कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी लोढा बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष बबनराव मुठे होते. शहर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पारखी, सुनील मुथ्था, सुनील वाणी, अनिल भनगडे, सतीश सौदागर उपस्थित होते.
कोरोना योद्धा म्हणून डॉ. वसंत जमधडे, डॉ. योगेश बंड, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक राजेश अलग, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष संजय जोशी, कल्याण कुंकलोळ, सुनील गुप्ता, नारायण काळे, नवाज शेख, बंडू शिंदे, महाराज कंत्रोड, बंटी गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी रामभाऊ तरस, संतोष हरगुडे, दत्ता जाधव, रूपेश हरकल, विशाल अंभोरे, अरुण काळे, संदीप आसने, रूपेश आठवाल, शैलेश खाटेकर, दीपक दुग्गड, मिलिंद साळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. आभार संतोष हरगुडे यांनी मानले.