मोदींवर टीका करण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढा-रामदेव बाबा यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 05:40 PM2019-12-08T17:40:05+5:302019-12-08T17:41:18+5:30

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करु नका. यातून मार्ग काढत स्वत: ला सिध्द करा, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. 

Instead of criticizing Modi, take a stand on the problems-appeal of Ramdev Baba | मोदींवर टीका करण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढा-रामदेव बाबा यांचे आवाहन

मोदींवर टीका करण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढा-रामदेव बाबा यांचे आवाहन

संगमनेर : आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. मात्र केवळ या समस्यांवर विचार करीत बसू नका. या विषयांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करु नका. यातून मार्ग काढत स्वत: ला सिध्द करा, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. 
संगमनेर येथे गीता महोत्सवाला रविवारी दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लक्षणीय होती. 
रामदेव बाबा पुढे म्हणाले, समाजात चांगले नागरिक घडविण्याची क्षमता गीता संस्कारात आहे. त्यामुळे गीता परिवाराचा उपक्रम स्तुत आहे. 
गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेर येथे ७१ हजार गीतेचे मुखोद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्त गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी या गीता महोत्सवाचे नियोजन केले आहे. या महोत्सवात विविध ठिकाणाहून येणारे ८ राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परराज्यातून येणा-या शेकडो विद्यार्थ्यांच्या निवास, जेवण आणि अगदी छोट्या, छोट्या गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.२०१६ साली गीता परिवाराने राष्ट्रीय योग संस्कार महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज उपस्थित होते. आजही या कार्यक्रमास रामदेव बाबांची उपथिती आहे. 
रविवारी सकाळपासून गीता महोत्सवात शौर्य प्रात्यक्षिक, योग प्रात्याक्षिक, नृत्य सादरीकरणाने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते. 
 

Web Title: Instead of criticizing Modi, take a stand on the problems-appeal of Ramdev Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.