विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना द्याव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:21 AM2021-04-21T04:21:10+5:302021-04-21T04:21:10+5:30
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर आयटीआय मधील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निदेशकांना देखील घरी राहूनच ...
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर आयटीआय मधील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निदेशकांना देखील घरी राहूनच प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना करण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सोमवारी (दि.१९) दिले आहे.
थोरात म्हणाले, निदेशकांनी घरी राहूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा खुद्द नाशिक विभागाचे सहायक संचालक यांनी १२ एप्रिलला आदेश काढला आहे. त्यानुसार नगर येथील निदेशक संघटनेच्यावतीने १५ एप्रिलला नगर आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन दिले आहे. परंतु, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली आहे. सद्यस्थितीत आयटीआयमधील ६० टक्के कर्मचारी कोरोना बाधित आहे. त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेता. आयटीआयच्या प्राचार्यांना शिक्षकांना घरूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातील सूचना देण्यात याव्यात.