पारनेर तालुक्यात स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:05 PM2020-07-16T13:05:08+5:302020-07-16T13:10:49+5:30
पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, रूईछत्रपती, पाडळी रांजणगाव, डिकसळ येथील स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. ढवळपुरी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यात येणारे धान्य अपुरे असल्याने ते खरोखरच स्वस्त आहे की फस्त केले जाते, असा प्रश्न रेशनधारकांना पडला आहे.
विनोद गोळे

तालुक्यात अनेक ठिकाणी धान्याचा सेवा संस्था पुरवठा करतात. सध्या सगळीकडे पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होत आहे. त्यामुळे धान्य वितरणात कमी गडबडी होत आहेत. मात्र कोरोनानंतर केेंद्र सरकार आणि राज्य सरकारने गहू, तांदूळ, डाळ यांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अनागोंदी होत आहेत.
वनकुटे, पाडळी रांजणगाव येथे धान्य वितरण व्यवस्थित होत नसल्याने तक्रारी होत्या. याबाबत नायब तहसीलदार सुभाष माळवे यांच्या पथकाने या धान्य दुकानात जाऊन चौकशी केली आहे.
या दुकानातील धान्य वितरण सुरळीतपणे सुरू असल्याचे नायब तहसीलदार लक्ष्मीकांत रोहोकले यांनी सांगितले.
ढवळपुरी येथील धान्य दुकानाबाबत तक्रारी असून त्यात काही अनागोंदी आढळून आल्याचे समजते. त्यामुळे येथील दुकान निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
दुर्गम भागात ‘रेंज’चे अडथळे
च्पारनेर तालुक्यातील पळसपूर, पोखरी, देसवडे, काटाळवेढा, वनकुटे, वारणवाडी भागात इंटरनेट नसल्याने पॉस मशीनवर धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत.
च्अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.
पारनेर तालुक्यातील धान्य दुकानांमध्ये सुरळीतपणे धान्य वाटप सुरू आहे. ढवळपुरी येथील दुकानांबाबतीत चौकशी करून दुकान निलंबन प्रस्ताव पाठवला आहे. इतर दुकानांंची नायब तहसीलदार यांच्या पथकाने चौकशी केली आहे.
- ज्योती देवरे,
तहसीलदार, पारनेर