कायगावकर ज्वेलर्समध्ये दागिन्यांना विमा संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:36+5:302021-02-14T04:19:36+5:30
अहमदनगर : येथील एस. जी. कायगावकर सुवर्णदालनात आता सुंदर दागिन्यांबरोबरच मौल्यवान दागिन्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्व ...
अहमदनगर : येथील एस. जी. कायगावकर सुवर्णदालनात आता सुंदर दागिन्यांबरोबरच मौल्यवान दागिन्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रकारचे सोने, चांदी, डायमंडच्या दागिन्यांवर मोफत विमा कवच मिळणार असून संपूर्ण वर्षभर सोन्याचे मंगळसूत्र तसेच डायमंडला विम्याचे संरक्षण मिळणार आहे. ग्राहकांनी केलेली ही मौल्यवान खरेदी सुरक्षित रहावी, चोरीला गेल्यास त्याचा परतावा मिळावा या उद्देशाने ही विमा कवच योजना आणल्याची माहिती सुभाष कायगावकर यांनी दिली.
सागर कायगावकर म्हणाले, आपल्याकडे सोने, चांदी, डायमंडची खरेदी करताना हौस, आवड याबरोबरच दीर्घ काळाची गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. अशावेळी अनेकदा दागिने चोरीला जाण्याची मनात भीती असते. त्यामुळे एस. जी. कायगावकर ज्वेलर्सने विमा संरक्षणाची अभिनव योजना आणली आहे. यात विम्याचा प्रिमियम दालनातर्फे कंपनीला अदा केला जाईल. फेब्रुवारीमध्ये महिनाभर सर्व प्रकारच्या दागिन्यांना मोफत विमा कवच मिळणार असून उर्वरित वर्षभर सोन्याचे मंगळसूत्र व डायमंडला विमा संरक्षण मिळेल. या योजना कालावधीत एस. जी. कायगांवकरची सावेडी व गंजबाजार येथील दोन्ही दालनात सेवा कार्यान्वित झाली आहे, असे कायगावकर यांनी सांगितले.