त्वरित रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:18+5:302021-08-29T04:22:18+5:30

२०० वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवैध वाळू वाहतुकीमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. बेटाला जोडणाऱ्या ...

Intense agitation if the road is not repaired immediately | त्वरित रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन

त्वरित रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन

२०० वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवैध वाळू वाहतुकीमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. बेटाला जोडणाऱ्या माळेवाडी गोवर्धन - बेट या रस्त्यासह नाऊर-सावखेड गंगा - बेट तसेच नाऊर - गोवर्धन ते बेटापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने या खड्ड्यांतून मार्ग काढणे वाहनधारकांना जिकिरीचे ठरत आहे. परिसरातील रुग्णांना दवाखान्यात ने - आण करताना या रस्त्यामुळे असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाची ने-आण करणेही शेतकऱ्यांना अत्यंत कठीण झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच राहुल जगताप यांच्यासह तात्यासाहेब जगताप, साईनाथ मोरे, अशोक मोरे, ऋषिकेश जगताप, संतोष थोरात, सागर चव्हाण, दादासाहेब जगताप, गणेश जगताप, प्रवीण जगताप यांनी दिला आहे.

(२८ नाऊर)

Web Title: Intense agitation if the road is not repaired immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.