अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:10+5:302021-05-28T04:16:10+5:30

युनेस्कोने २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस म्हणून साजरा करावा, असे घोषित केले. पृथ्वीवरील थक्क करणाऱ्या जैवविविधता माहितीचा ...

International Biodiversity Day celebrated at Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा

अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा

युनेस्कोने २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस म्हणून साजरा करावा, असे घोषित केले. पृथ्वीवरील थक्क करणाऱ्या जैवविविधता माहितीचा प्रसार करणे, विविधतेचे संरक्षण करणे याविषयी जागृती करणे या विचारातून हा दिवस साजरा करण्यात येतो. जैव-विविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनविला, तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधताविषयक नियम लागू आहेत. या दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन विविध संस्थांकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

तरुणाईमध्ये जैव-विविधताविषयक जाणीव जागृती व्हावी, हा उद्देश ठेवून अहमदनगर महाविद्यालयातील विज्ञान मंचने जाणीव जागृती मंजुषाचे आयोजन केले होते. विज्ञान मंचचे समन्वयक डॉ. अभिजित कुलकर्णी आणि सदस्य यांनी प्रश्न मंजुषाचे आयोजन केले. या प्रश्न मंजुषा उपक्रमात १२ विद्यापीठांतर्गत १५० हून अधिक महाविद्यालयांतील १५३५ विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा भाग म्हणून सहभागींना जैव-विविधताविषयी माहिती पी.डी.एफ. स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पी.डी.एफ. स्वरूपात वाचन साहित्याचे संकलन प्रा. प्रशांत कटके यांनी केले आहे. तांत्रिक सहयोग साई सुरम यांनी दिला.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. रझाक सय्यद, रजिस्ट्रार दीपक अल्हाट आणि आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: International Biodiversity Day celebrated at Ahmednagar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.