आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो-खोचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:08+5:302021-03-27T04:21:08+5:30

नगर शहर आणि जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या खेलो इंडिया योजनेप्रमाणे खेलो महाराष्ट्र या ...

International standard Kho-Kho training center should be started | आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो-खोचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो-खोचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे

नगर शहर आणि जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या खेलो इंडिया

योजनेप्रमाणे खेलो महाराष्ट्र या योजनेचे प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवावेत. अहमदनगर शहरात खो-खो या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करून शासनास पाठविण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याकडे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय

पवार, प्रा. श्रीकांत निंबाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, वैभव जगताप, अशोक बाबर आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, प्रा. श्रीकांत निंबाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, वैभव जगताप, अशोक बाबर उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, योजना मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. खेलो इंडिया योजनेअंतर्गत देशामध्ये १०० प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यांत लोकप्रिय असलेल्या व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असलेल्या खेळाचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. कबड्डी, ज्युदो, आर्चरी, जलतरण इत्यादी

खेळांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्याशिवाय खो-खो या खेळाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय

दर्जाचे शेकडो खेळाडू आपल्याकडे आहेत. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूही आपल्याकडे आहेत.

शेखर पाटील म्हणाले, एप्रिल महिन्यापासून खो-खो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण सुरू करण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे. चांगल्या दर्जाचे मैदान निर्माण करू. चांगले प्रशिक्षक नेमून शहरासह जिल्ह्यातील खेळाडू निर्माण करू. याचबरोबर वाडियापार्क येथे इतर खेळांचेही प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस आहे.

२६ संग्राम जगताप

Web Title: International standard Kho-Kho training center should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.