भाजपाचे निलंबित वाकचौरे, वहाडणे मुलाखतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:52 PM2019-09-04T14:52:44+5:302019-09-04T14:54:40+5:30

भारतीय जनता पक्षातून निलंबित केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे दोघेही मुलाखतीसाठी उपस्थित होते.

Interview to suspend BJP, walk away | भाजपाचे निलंबित वाकचौरे, वहाडणे मुलाखतीला

भाजपाचे निलंबित वाकचौरे, वहाडणे मुलाखतीला

अहमदनगर : भारतीय जनता पक्षातून निलंबित केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे दोघेही मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले होते. त्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश द्यावा,  असा प्रस्ताव जिल्हा भाजपने प्रदेश भाजपकडे पाठवलेला आहे. असेही प्राध्यापक बेरड यांनी सांगितले. 
     दरम्यान वहाडणे आणि वाकचौरे यांनी उमेदवारासाठी मुलाखती दिल्या नाहीत तर फक्त त्यांनी प्रदेश सरचिटणीस यांची भेट घेतली असा खुलासाही बेरड यांनी  केला.
भारतीय जनता पक्षाच्या बारा विधानसभा मतदारसंघात ३७२२ बूथ तयार करण्यात आलेले आहेत. श्याम जाजू आणि राम शिंदे हे दोन प्रमुख वक्ते बुथ समित्यांचे मेळावे घेतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड.यांनी दिली.
बुधवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस रामदास आबटकर,  खासदार डॉक्टर सुजय विखे आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पूर्व परवानगी घेऊन ते अनुपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील बारावी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी भाजपची तयारी करण्यात आली आहे. आगामी पंधरा दिवसात जिल्हाभरात मिळावे होतील. आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती कशी करायची याचे मार्गदर्शन भाजपचे सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी सकाळी कार्यकर्त्यांना केले. जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका होईपर्यंत पदाधिकाºयांनी बारीक लक्ष ठेवून मतदारसंघात काम करण्यासंदर्भात आबटकर यांनी सूचना दिल्या.

Web Title: Interview to suspend BJP, walk away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.