भंडारा घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:20+5:302021-01-10T04:15:20+5:30
कोपरगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची ...
कोपरगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे म्हणल्या, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत, हे तपासण्याची गरज आहे. अनेक रुग्णालये, नर्सिंग होम यांचे फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रुग्णालयांमध्ये वायरिंग वर्षोनुवर्षे बदलली जात नाही, त्यावरच रुग्णालयातील विविध मशीन चालत असतात. त्यामुळे ती बदलण्याची गरज आहे. दरम्यान या दुर्घटनेत त्या हॉस्पिटलमधील परिचारिका आणि काही कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचवल्याबद्दल कोल्हे यांनी आभार मानले. मात्र, दहा मुलांचे प्राण गेल्याने कोल्हे यांनी दुःखही व्यक्त केले.