राहुरी फॅक्टरी परिसरातील गुन्ह्यांचा तपास लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:22 AM2021-02-11T04:22:30+5:302021-02-11T04:22:30+5:30
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावावा. अवैध धंदे व फोफावलेल्या गुन्हेगारीला तातडीने आळा घालावा़ ...
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावावा. अवैध धंदे व फोफावलेल्या गुन्हेगारीला तातडीने आळा घालावा़ अशी मागणी राहूरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटना व व्यापारी वर्गाने पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याकडे मंगळवारी एका निवेदनाव्दारे केली आहे.
तातडीने गुन्हेगारीला आळा न घातल्यास राहुरी तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना दिले.
यावेळी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, शांती चौक मित्र मंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, नगरसेवक आण्णासाहेब चोथे, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, प्रशांत काळे, साई आदर्शचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, हर्षद ताथेड, सुरेश लोखंडे, मराठा महासंघाचे रावसाहेब मुसमाडे, संदीप कदम, भास्कर कोळसे, दत्ता साळुंके, दत्तात्रय दरंदले, प्रदीप गरड, पत्रकार रफिक शेख, ललित चोरडिया, बाळू लोखंडे, प्रकाश सोनी, संतोष झावरे उपस्थित होते.
....
राहुरी फॅक्टरी परिसरातील गुन्हेगारीला तातडीने आळा न घातल्यास तहसील कार्यालयासमोर सर्व व्यापारी, नागरिक यांना सोबत घेऊन उपोषण करू.
-दीपक त्रिभुवन, अध्यक्ष, शांती चौक मित्र मंडळ.
...
व्यापारी वर्गाला गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून त्रास होत असेल तर त्यांनी मला वैयक्तीक क्रमांकावर फोन करा. पोलीस त्यावर कारवाई करतील. -हनुमंत गाडे,
पोलीस निरीक्षक, राहुरी.
...
फोटो-१० राहुरी निवदेन
..
ओळी-राहुरी फॅक्टरी येथील गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावावा, या मागणीचे निवदेन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना देताना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी.