पैशाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:33 PM2018-07-19T16:33:14+5:302018-07-19T16:33:32+5:30
पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या श्रीगोंदा येथील डॉक्टरसह दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या श्रीगोंदा येथील डॉक्टरसह दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संगीता सोमनाथ तरटे (वय ४४ रा. पळवे खुर्द ता. पारनेर) यांनी मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे. डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबिरे (रा. श्रीगोंदा) भगवतीबाई रतनसिंग सिसोदिया मथ्सी (रा. शहाजापूर, मध्यप्रदेश) व संतोष जवाहरसिंग पवार यांनी शहरातील वाडियापार्क येथील गाळा क्रमांक ११ येथे रिलायबल लॅण्ड ओर्स अॅण्ड डेव्हलपर्स लि. ही गुंतवणूक कंपनी स्थापन केली. २००९ मध्ये तरटे यांनी या कंपनीत ३९ लाख ८४ हजार रूपयांची एफडी केली. या गुंतवणुकीची मुदत २०१५ मध्येच संपली. तरटे यांना कंपनीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.