पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा-हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 04:27 PM2017-04-09T16:27:22+5:302017-04-09T16:27:22+5:30
पांगरमल विषारी दारूकांडाने सुमारे दहा ते बार जणांचा बळी घेतला असून, या प्रकरणाची सी़आय़डी़ चौकशी करावी,
आॅनलाईन लोकमत
पारनेर (अहमदनगर), दि़ ९- नगर तालुक्यातील पांगरमल विषारी दारूकांडाने सुमारे दहा ते बार जणांचा बळी घेतला असून, या प्रकरणाची सी़आय़डी़ चौकशी करावी, अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांना केली आहे़ या प्रकरणातील जिल्ह्याचे पोलीस व उत्पादनशुल्क विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसह सगळ्यांची साखळीच यातून बाहेर येईल़ यामुळे तपास पथकात जिल्ह्यातील अधिकारी घेऊ नये, असेही अण्णांनी म्हटले आहे़