शेवगाव गोळीबाराची ‘एसडीओ’कडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:02 AM2017-11-20T05:02:06+5:302017-11-20T05:02:10+5:30

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराची श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण चौकशी करतील.

Investigation by the SDO of Shevgaon firing | शेवगाव गोळीबाराची ‘एसडीओ’कडून चौकशी

शेवगाव गोळीबाराची ‘एसडीओ’कडून चौकशी

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराची श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण चौकशी करतील. महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी दिला.
घोटण-खानापूर येथे १५ नोव्हेंबरला गंगामाई साखर कारखान्याने प्रतिटन दर वाढून देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांनी आंदोलन केले होते़ त्यास हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी पंप अ‍ॅक्शन गणने मारा केल्याने दोन शेतकरी जखमी झाले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चार दिवसांपूर्वी शेतकºयांची भेट घेऊन गोळीबाराची दंडाधिकाºयांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले होते़ आंदोलनादरम्यान गोळीबार करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती का?, गोळीबार समर्थनीय होता का?, आदींची चौकशी ते करणार आहेत.

Web Title: Investigation by the SDO of Shevgaon firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.