्कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ५६ जणांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:17 PM2020-05-12T17:17:36+5:302020-05-12T17:17:43+5:30
अहमदनगर : नगर शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून, या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
अहमदनगर : नगर शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून, या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारी गल्ली येथील महिलेला सर्दी,खोकला, ताप आदी त्रास झाला होता. म्हणून ही महिला स्वत:हून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. ‘सारी’ या आजाराची लक्षणे आढळून आल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिलेचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने महापालिकेने या महिलेला ताब्यात घेऊन सुरुवातीला बूथ हॉस्पिटलमध्ये नेले होते. परंतु या महिलेला जास्त त्रास होत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेची विचारपूस केली असता ही महिला एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. या डॉक्टरसह या भागातील भागातील ५६ जण महिलेच्या संपर्कात आले आहेत, असे आढळून आले. त्यांना एका बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे या रुग्णांची तपासणी सुरू आहे. तपासणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करायचे की घरी सोडायचे, याचा निर्णय होणार आहे.