म्युच्युअल फंडात गुंतवणूक अधिक परतावा देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:02+5:302021-09-26T04:23:02+5:30
कोपरगाव शहरातील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्या वतीने एकदिवसीय ...
कोपरगाव शहरातील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्या वतीने एकदिवसीय वेबिनार नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी भिशीकर प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव होते. या वेबिनारसाठी तब्बल १३९ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
भिशीकर म्हणाले, प्रत्येक नोकरदारासाठी, बऱ्यापैकी उत्पन्न असणाऱ्या इतर घटकांसाठी गुंतवणूक ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अशा लोकांचे अनेक प्रश्न आणि जिज्ञासा असतात. त्यांची सोडवणूक करणे हाही एक उद्देश आहे. गुंतवणूक कशी असावी ? तर ती २० टक्के सोने व विम्याच्या स्वरूपात असावी, ४० टक्के भागबाजार किंवा इक्विटीच्या आणि ४० टक्के डेबट किंवा स्थिर गुंतवणूक असावी. ''रूल ऑफ ७२'' चा वापर करून आपण आपल्या गुंतवणुकीवरील परतावा जाणून घेऊ शकतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ''एफडी'' जरूर रही है म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज स्वरूपात व्याज मिळत असल्याने त्याला प्राधान्य द्यावे.
वेबिनारचे संयोजक व वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्य प्रो. एस. आर. पगारे यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे डॉ. एस. एल. अरगडे यांनी केले. प्रा. आर. ए. जाधव यांनी आभार मानले. प्रा. अजित धनवटे यांनी वेबिनार यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.