सोन्यापेक्षा शेअर्समध्येच गुंतवणूक फायदेशीर
By Admin | Published: May 23, 2014 01:21 AM2014-05-23T01:21:27+5:302014-05-23T01:28:35+5:30
अहमदनगर : संगणकीकरणामुळे शेअर बाजारात पारदर्शकता आली आहे. डी-मॅट यंत्रणेमुळे शेअर बाजारात गतिमानता आली आहे.
अहमदनगर : संगणकीकरणामुळे शेअर बाजारात पारदर्शकता आली आहे. डी-मॅट यंत्रणेमुळे शेअर बाजारात गतिमानता आली आहे. सोन्यापेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. अधिकृत ब्रोकरमार्फतच शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करावेत, असा सल्ला सीडीएसएल संस्थेचे मुख्य गुंतवणूकदार चंद्रशेखर ठाकूर यांनी दिला. नगर जिल्हा वाचलनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत गुरुवारी (दि़२२) ठाकूर यांनी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, सध्याच्या स्थितीत बाजारात पॅकेज सिस्टिम आली आहे. ३२ हजारांच्या वस्तू २३ हजार रुपयांना मिळत आहेत. याच जाहिरातीला ग्राहक फसत आहेत. पैसा वाचविणे म्हणजे पैसा मिळविणे असे नाही. भारतात सोन्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. सरकारने २०१३ मध्ये १ हजार ९२ मेट्रिक टन सोने २९ हजार २३८ कोटी खर्च करून परदेशातून आयात केले. ते आज बंद तिजोरीत ठेवले आहे. ही मृत गुंतवणूक आहे. गरज लागेल तेव्हा सोने विकून त्याचा पैसा करणार्यांचे प्रमाण फक्त दीड टक्का आहे. सोने विकले की तुमची पत बाजारात रसातळाला गेली, असे समजले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) एकाच वेळी एकाच ब्रोकरमार्फत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू नयेत. सेबीने दिलेले नोंदणीपत्र पाहूनच व्यवहार करावा शेअर बाजार गुंतागुंतीचा आहे, हा गैरसमज काढून टाका शेअर खरेदी-विक्रीसाठी शेअर ब्रोकर, बँक, डिलीव्हरी सिस्टीम या तीन बाबी आवश्यक