पाटबंधारे विभागाने वाढीव पाणीपट्टीचा पुनर्विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:20 AM2021-02-12T04:20:05+5:302021-02-12T04:20:05+5:30
कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारणीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी संदर्भात ...
कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारणीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी संदर्भात पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन कोपरगाव तालुक्यातील पाटपाणी लाभधारक शेतकऱ्यांनी गोदावरी डावा तट कालव्याचे कोपरगाव येथील उपकार्यकारी अभियंता यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायम उन्हाळी आवर्तनासाठी गोदावरी कालव्यावर सात नंबर अर्ज भरून पाटपाण्याची मागणी करतो. त्यावर आकारण्यात येणारी पाणीपट्टीदेखील भरतो. परंतु, गेल्या वर्षापासून पाटबंधारे विभागामार्फत आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही पूर्वीप्रमाणेच आकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रवीण शिंदे, तुषार विध्वंस, अनिल लोणारी, राहुल लोणारी, अभिजीत लोणारी, विजया लोणारी, हर्षल परजणे, अमोल परजणे, राजेंद्र संवत्सरकर, भाऊसाहेब संवत्सरकर, शेखर परजणे, रंगनाथ परजणे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.