कोपरगाव तालुक्यातील वारीतील उद्भवाचे पाणी दूषितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:46 PM2018-06-13T17:46:16+5:302018-06-14T09:50:00+5:30

तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

 Irritable water in Kopargaon taluka is contaminated | कोपरगाव तालुक्यातील वारीतील उद्भवाचे पाणी दूषितच

कोपरगाव तालुक्यातील वारीतील उद्भवाचे पाणी दूषितच

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य प्रयोग शाळेचा अहवाल : पाण्याला रासायनिक वास

रोहित टेके
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. येथील उद्भवतील पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले होते. या अहवालात वारीतील पाण्याचे उद्भव दूषित असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेनं दिला आहे.
सीलबंद बाटलीत प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या मार्फत दि .७ जून रोजी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा ,अहमदनगर यांच्याकडे रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंगळवार (दि.१३ जून) रोजी प्राप्त झाला असून या पाण्यात विशिष्ठ प्रकारचा रासायनिक श्रोत असून त्याचा उग्र स्वरूपाचा वास येत असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु याविषयावर कारखाना व्यवस्थापन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. तर वारी परिसरातील तब्बल २७ विहरी व ६ हातपंप दुषित्त झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या असताना शिडीर्चे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी या गंभीर विषयाची कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसते आहे त्यामुळे या विषयाकडे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी लक्ष घालावे अशी वारीतील ग्रामस्थांनी मागणी आहे .


आमच्या प्रयोग शाळेत दि .७ जून रोजी तपासणीसाठी वारी ता .कोपरगाव येथून आलेल्या पाणी नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये विशिष्ठ प्रकारचा रासायनिक वास येत असून ते पाणी पिण्यास अयोग्य आहे. ते पाणी पिल्याने कायमस्वरूपीचे पोटाचे विकार तसेच शारिरिक संपर्कात आल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या परिसरातील पाण्याची पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी केल्यास रासायनिक घटकाची नावे समजू शकतील.
- ए .एच .अबोडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा प्रयोग शाळा,अ .नगर


बुधवार दि .१३ रोजी माझे सहकारी आरोग्यसेवक सतीश ठोकळ आम्ही दोघांनी येथील दुषित पाणी असल्याचा अहवाल आलेल्या उद्भवला पुन्हा भेट दिली. उदभवातील पाण्याचा अत्यंत उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे प्राथमिक जाणवले. - बी .एल .बनसोडे, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र वारी, कोपरगाव

 

 

Web Title:  Irritable water in Kopargaon taluka is contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.