येसगावात पैशाच्या कारणावरून इसमाचा खून
By सचिन धर्मापुरीकर | Updated: September 12, 2023 02:51 IST2023-09-12T02:49:43+5:302023-09-12T02:51:40+5:30
या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

येसगावात पैशाच्या कारणावरून इसमाचा खून
कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील येसगाव शिवारात आर्थिक कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर दिपक दादा गांगुर्डे (वय ३५) हा युवक फावड्याच्या दांड्याने डोक्यात प्रहार झाल्याने ठार झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कोपरगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींवर कारवाईची सुरुवात केली आहे. यात सदर घनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.