समितीच्या माध्यमातून विधवा महिलांचे प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:26 AM2021-08-17T04:26:18+5:302021-08-17T04:26:18+5:30
कोपरगाव : नगर जिल्ह्यातील कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी नुकतीच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची ...
कोपरगाव : नगर जिल्ह्यातील कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी नुकतीच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेतली आहे. जिल्ह्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करावे व जिल्ह्याच्या टास्क फोर्समध्ये विधवांसाठी काम करणाऱ्या समिती सदस्यांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे या महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा तसेच संजय गांधी निराधार योजनेत सुलभीकरण आणावे, अशा प्रमुख मागण्यांवर चर्चा केली. या सर्व मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे कोपरगाव एकल समितीच्या समन्वयक संगीता मालकर यांनी सांगितले आहे. यावेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समितीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.