एकटे पायी फिरुन तो करतोय शेतकरी संपाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 02:36 PM2017-06-02T14:36:15+5:302017-06-02T14:36:15+5:30
हातात एक पिशवी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर शेतकरी संपाला पाठिबा दर्शवणारा व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार करणारा फलक
आॅनलाईन लोकमत
शेवगाव, दि़ २ - हातात एक पिशवी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर शेतकरी संपाला पाठिबा दर्शवणारा व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार करणारा फलक अशा वेशात शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या पुनर्वसित गावातून निघालेले धरणग्रस्त शेतकरी सदाशिव शिंदे शेतकऱ्यांच्या संपाबाबत पायी फिरुन जनजागृती करीत आहेत़
गावागावात माणसांचा जेथे माणसांची गर्दी दिसेल तेथे, चौका-चौकात तर कधी वेशीत उभे राहून सदाशिव शिंदे हे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शेतकरी संपाची जनजागृती करीत आहे़
शेतकरी तुमच्या व्यवस्थेचा कणा़ पण तुम्ही त्योच मोडायला निघालेत तर आता तुमचं शासन आणि इकास बी मोडून पडल्याबिगर राहणार नाही, निसतं बळीराजा म्हणायचं, मोठेपण द्यायचं आणि भर बाजारात लुटायचं हे धोरण आता चालणार न्हाय़ शासनाला जाग येणार नसल तर आमचे बायका, पोरं अन्न, पाणी बंद करतेन पण आता माघार घेणार न्हाय, अशा शब्दात शिंदे गावोगाव पायी फिरुन जनजागृती करीत आहेत़