श्रीगोंदा येथे सुरू झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:00+5:302021-05-31T04:17:00+5:30
अहमदनगर : ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत गाडे यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने श्रीगोंदा येथे मालधक्का नुकताच सुरू करण्यात ...
अहमदनगर : ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत गाडे यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने श्रीगोंदा येथे मालधक्का नुकताच सुरू करण्यात आला आहे.
मालधक्का सुरू झाल्याने गाडे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योजक करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, रमाकांतनाना गाडे, गुरवेंदरसिंग वाही, रामराव मुनफन, रामभाऊ कोतकर, ज्ञानेश्वर ठाणगे, युवराज गाडे आदी उपस्थित होते. अहमदनगर रेल्वे येथील मालधक्क्यावर येणारे साहित्य, अन्यधान्य व इतर माल वाहतूक करण्यासाठी शहरातून जावे लागत असल्याने वाहनचालकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी रमाकांत गाडे यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा व पत्रव्यवहार करून श्रीगोंदा येथे मालधक्का चालू करण्याची मागणी केली होती. या मागणीला मान्य करून श्रीगोंदा येथे साखर कारखाने जवळ असल्याने धक्क्यावर साखर मोठ्या प्रमाणावर आयात होणार आहे. या हेतूने मालधक्का चालू करण्यात आला आहे. तसेच राहुरी व विळद घाट येथे मालधक्का चालू करण्यात यावा, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.