नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:12+5:302021-09-23T04:23:12+5:30
श्रीरामपूर : कोविड काळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर तब्बल ५० रुपये ...
श्रीरामपूर : कोविड काळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर तब्बल ५० रुपये केले होते. मात्र कोविडची स्थिती नियंत्रणात येताच हे दर कमी करून १० रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नातेवाईकांना सोडायला जाणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांसोबत त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी होत असते. स्थानकांवर सकाळ सायंकाळ फिरायला येणाऱ्या लोकांचीही संख्या असते. कोविड काळात स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी रेल्वेस्थानकावर येण्याचे टाळले होते. विनाकारण स्थानकावर फिरायला येणाऱ्या लोकांची गर्दीही त्यामुळे रोडावली होती. आता मात्र रेल्वे प्रशासनाने दर पूर्ववत केल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
-------
प्लॅटफॉर्म तिकिटाविना प्रवेश
जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर आजही प्लॅटफॉर्म तिकिटांची रेल्वे तिकिटांच्या तुलनेत विक्री होत नाही. अधिकांश नागरिक प्लॅटफॉर्म तिकिटांविना स्थानकांमध्ये प्रवेश करतात. अशा लोकांची स्थानकावर कडक तपासणी व्हायला हवी. एखाद दुसरी कारवाई केली जाते. मात्र अनेकजण स्थानकांचा वापर करतात.
------
सुरू असलेल्या रेल्वे
गोवा एक्स्प्रेस
कर्नाटक एक्स्प्रेस
पुणे-पाटणा एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
झेलम एक्स्प्रेस
साईनगर दादर एक्स्प्रेस
--------