लॉकडाऊनमध्ये दुकाने सुरु ठेवणे पडले महागात; पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 01:52 PM2020-06-19T13:52:14+5:302020-06-19T13:52:57+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केले. तोंडला मास्क न लावता गुरुवारी (दि.१८ ) सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरु ठेवली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाच दुकान चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केले. तोंडला मास्क न लावता गुरुवारी (दि.१८ ) सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरु ठेवली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाच दुकान चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांनी कोपरगावची बाजारपेठ सुरु ठेवण्यासाठी काही नियम, अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठ सायंकाळी पाचनंतर बंद करण्यात येते.
गुरुवारी सायंकाळी ५ वाज नंतरही दुकाने सुरु ठेवल्याने शिवाजी दगडू खंडागळे (वय ७०), दत्तू शिवाजी खंडागळे (वय ४० ), अनिल जनार्दन भगिले, ( वय २३, रा. मुर्शदपुर, ता. कोपरगाव ), तुषार जयप्रकाश होडे (वय २९ ), सूरज जयप्रकाश होडे ( वय २५ रा. कोपरगाव ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.